HW News Marathi
Covid-19

माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरींचे कोरोनामुळे निधन

लखनऊ | राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह चौधरी यांचे आज (६ मे) कोरोनामुळे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून अजित सिंह यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये कोरोनाचा प्रचंड संसर्ग झाला होता. परिणामी त्यांची प्रकृती नाजूक होती.

अजित सिंह चौधरी हे देशाचे माझी पंतप्रधान चरणसिंह चौधरी यांचे पूत्र होते. उत्तर प्रदेशच्या बागपत मतदारसंघातून ते सातवेळा लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांनी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती. अजित सिंह चौधरी हे उत्तर प्रदेशातील प्रमुख जाट नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या निधनाबद्दल रालोद आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिक रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना दुर्दैवी, उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

दिलासादायक ! राज्यात १ लाखांच्या पुढे लोकं झाली कोरोनामुक्त

News Desk

राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक, १४,४९२ नवे रुग्ण आढळले

News Desk