HW Marathi
देश / विदेश

देशातील स्वच्छतेच्या कामासाठी मी कायम तुमच्यासोबत !

मुंबई । महानायक अमिताभ बच्चन यांनी बुधवारी (६ फेब्रुवारी) केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘दरवाजा बंद’च्या दुसऱ्या मोहिमेचे उद्घाटन केले. “देशातील स्वच्छतेच्या कामासाठी मी आणि माझा आवाज कायम तुमच्या सोबत राहील”, असे आश्वासन यावेळी अमिताभ बच्चन यांनी दिले. गेल्या काही काळात देशभरात झालेल्या स्वच्छतेच्या कामाचे संपूर्ण श्रेय हे या अभियानासाठी गावागावांत काम करणाऱ्या लोकांचे असल्याचे देखील बच्चन यावेळी म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानातील अमिताभ बच्चन यांचा सहभाग हा राज्याला अत्यंत महत्त्वाचा ठरला असल्याचे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले. या अभियानांतर्गत देशात ९८ टक्के स्वच्छतागृहे बांधण्यात आली असून देशातील २ लाख ५० हजार ग्रामपंचायतींचा यात सक्रिय सहभाग आहे. आता या अभियानांतर्गत ‘दरवाजा बंद-२’ ही जाहिरात मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छ भारतमुळे चार वर्षांत महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलल्याचे बबनराव लोणीकर यांनी सांगितले. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, केंद्रीय सचिव परमेश्वरन अय्यर, जागतिक बँकेचे हिशाम हे कार्यक्रमास उपस्थित होते.

Related posts

मुंबई विद्यापीठाला टॉप १०० मध्ये जागा नाही

News Desk

दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत डीएसपी अमन ठाकूर शहीद

News Desk

प्रेयसीने प्रियकराला भोसकले

News Desk