श्रीनगर | “जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे येथील भूमिपूत्र आहेत. त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. सध्या दहशतवाद्यांच्या प्रमुखांशी चर्चा करणे आवश्यक आहे. कारण या दहशतवाद्यांच्या प्रमुखांकडे शस्त्र आहेत. त्यामुळे तेच ही शस्त्र संस्कृती संपवू शकतात”, असा तर्क जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी मांडला आहे.
PDP Chief and former J&K CM Mehbooba Mufti: I've always said that the local militant is the son of the soil. Our attempts should be to save him. I believe, in Jammu and Kashmir, not only Hurriyat but those with the guns should also be engaged with, but not at this time. pic.twitter.com/zMcMGp3jda
— ANI (@ANI) January 15, 2019
“२०१४ च्या निवडणुकांपूर्वी मतांच्या गणितासाठी काँग्रेसकडून अफजल गुरुला फाशी देण्यात आली होती. आता कन्हैया, उमर खालिद आणि जम्मू-काश्मीरच्या ७ ते ८ विद्यार्थ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करून भाजपने देखील हेच करीत आहे”, असा टोला मेहबुबा मुफ्ती यांनी लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.