HW Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४ चकमकी, २-३ दहशतवादी लपून बसल्याची शक्यता  

नवी दिल्ली | गेल्या २४ तासांमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये ४ चकमकी झाल्या आहेत. शोपियान जिल्ह्यातील इमाम भागात अद्याप एक चकमक सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका घरात २ ते ३ दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळत आहे. बंदीपोरा येथील चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना लष्कर-ए-तोयबाच्या २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. यात लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर अलीभाईचा देखील समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या २४ तासांमध्ये झालेल्या या ४ चकमकींमध्ये आतापर्यंत ५ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यात गुरुवारी (२१ मार्च) झालेल्या चकमकीत २ दहशतवाद्यांना तर शोपिया जिल्ह्यात १ दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. बारामुल्ला येथील कलंतरा भागात २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती सुरक्षा दलाचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी दिली आहे.

शोपियान येथे सुरु असलेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह २ जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जखमी जवानांवर बादामीबाग येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरु केली होती. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली.

Related posts

अखिलेश यादवकडून शहीद पत्नीऐवजी भलतीचाच सत्कार

News Desk

भारताने युद्धाची भाषा केली तर मंदिरातील घंटानाद कधीही ऐकू येणार नाही !

News Desk

भारत-पाक सीमेवर २,०६१ पैकी केवळ ६६१ फेन्सिंग लाईट पोल्सच चालू

News Desk