HW Marathi
देश / विदेश

राज्यराणी एक्स्प्रेसच्या दिशेने अज्ञाताने भिरकावला दगड, मोटरमन जखमी

मुंबई | छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून नाशिककडे निघालेल्या राज्यराणी एक्स्प्रेसच्या दिशेने वासिंद आणि आटगावच्या दरम्यान एका अज्ञाताने दगड भिरकावल्याची घटना घडली आहे. या धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसवर मंगळवारी (४ डिसेंबर) रात्री ८ च्या सुमारास हा दगड भिरकावण्यात आला. यामध्ये इंजिनाची काच फुटून त्या काचेचा एक तुकडा मोटरमनच्या डोळ्यात गेल्याने हा मोटरमन जखमी झाला आहे.

मात्र, जखमी झाल्यानंतरही मोटारमननी प्रसंगावधानता राखत एक्स्प्रेस न थांबवता पुढे नेऊन कसारा रेल्वे स्थानकावर थांबवली. तेथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर एक्स्प्रेस नाशिकडे रवाना झाली. या मार्गावर दगडफेकीच्या घटनांचे प्रमाण वाढल्याने हा चिंतेचा विषय ठरत आहे.

Related posts

#PulwamaAttack : ‘कपिल शर्मा शो’मधून सिद्धू उचलबांगडी

News Desk

चीनचा 11 तास युद्ध सराव

News Desk

छत्तीसगढमध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी नक्षलवादी हल्ला

News Desk