नवी दिल्ली | आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे. नायडू सत्तेत असताना त्यांनी प्रजा वेदिका इमारत बनविली होती. परंतु आता आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसची सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी त्यांच्या बंगल्यावर बुलडोजर फिरवणार आहे. नायडू यांच्या निवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला. यामुळे नायडू यांना त्याचे निवस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेशशहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली आहे.
Andhra Pradesh Capital Region Development Authority has served notice to Former CM, N Chandrababu Naidu to vacate his current official residence. pic.twitter.com/E8KmJA3AqQ
— ANI (@ANI) June 28, 2019
आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली आहे. कृष्णा नदीकाठी घरांची विनापरवाना निर्माण करण्यात आले आहे. यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे ह्या नोटीस देण्यात आल्या असल्याचा सांगण्यात येत आहे. तसेच सात दिवसाच्या आत नोटीसला उत्तर दिले नाहीतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा विकास प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.