HW News Marathi
देश / विदेश

सीबीएसईच्या १० वी, १२ वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २९ मार्च २०१९ या कालावधीत घेण्यात येणार होणार आहे. तर बारावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ३ एप्रिल २०१९ या दरम्यान होणार आहे.

सीबीएसई १०वी आणि १२वीच्‍या परीक्षांचे वेळापत्रक सोमवारी (२४ डिसेंबर) जाहीर झाले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्‍या अधिकृत वेबसाइट https://cbse.nic.in वर हे वेळापत्रक विद्यार्थी पाहू शकतात. विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक डाऊनलोड करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हे फायद्याचे ठरणार आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षेआधी अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा. यासाठी सीबीएसई बोर्डाने सात आठवडे आधीच वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा सकाळी १० ते दुपारी दीड वाजेपर्यंत असणार आहे. उत्तरपत्रिका सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. तर प्रश्नपत्रिका सव्वा दहा वाजता देण्यात येतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमान प्रवासात संशयास्पद हालचाली करणाऱ्या तरुणास अटक

News Desk

Budget 2022: अर्थसंकल्पानंतर ‘या’ गोष्टी झाल्या स्वस्त

Aprna

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरच्या मृत्यूची पाकिस्तानी माध्यमांमध्ये चर्चा

News Desk