HW News Marathi
देश / विदेश

5 बँकांचे 500 कोटी बुडवून आणखी एक बिझनेसमॅन पसार

रोटोमॅक कंपनीचा मालक विक्रम कोठारी याने देशातील 5 सरकारी बॅंकांमधून 500 कोटी रुपयांचे कर्ज बुडवून फरार झाल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता बॅंकामधून हजारो कोटी रुपयांचे कर्ज घेऊन पळून जाणाऱ्यांच्या यादीत त्याचही नाव जोडल गेले आहे.

कोणत्या बँकांना लावला चुना?

कोठारीने अलाहाबाद बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक या बँकांना 500 कोटींचा चुना लावल्याचे उघड झाले आहे.

कोण आहे विक्रम कोठारी?

पान परागचे संस्थापक एम.एम.कोठारी यांचे विक्रम कोठारी हे पुत्र आहेत. वडिलांच्या मृत्यूनंतर विक्रम कोठारी याने स्टेशनरीचा व्यवसाय सुरु केला. रोटोमॅक नावाने त्याने पेन, स्टेशनरी, आमि ग्रीटिंग्स कार्डसचे काम सुरु केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कुठेही जा, तुमची ओळखही शिवसैनिक म्हणूनच’, संजय राऊतांचं प्रत्युत्तर

News Desk

निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द

News Desk

मार्च-एप्रिलमध्ये इंधनाचे दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडत आहात?, शिवसेनेचा केंद्राला सवाल

News Desk