HW News Marathi
देश / विदेश

राज्यसभा निवडणूक वाद, उच्च न्यायालयात याचिका दाखल

अहमदाबाद( वृत्तसंस्था) गुजरात राज्यसभा निवडणूक प्रकरणी गुजरात हायकोर्टाने सोमवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस नेते अहमद पटेल आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावाली. २१ सप्टेंबरपर्यंत उत्तर द्यावे असे निर्देश हायकोर्टाने या सर्वांना दिले आहेत.

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर बलवंतसिंह राजपूत यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला होता. भाजपने निवडणुकीत काँग्रेसच्या अहमद पटेल यांच्याविरोधात राजपूत यांना उमेदवारी दिली होती. नाट्यमय घडामोडींनी निवडणुकीत रंगत आली आणि पटेल यांनी विजय मिळवला. अमित शहांना धक्का देत काँग्रेसने प्रतिष्ठा कायम राखली. या निवडणुकीत शंकरसिंह वाघेला यांचे कट्टर समर्थक असलेले भोलासिंह गोहिल आणि राघवभाई पटेल या काँग्रेस आमदारांनी भाजपला मतदान केले. त्यांनी मतपत्रिका भाजपच्या निवडणूक प्रतिनिधींना उघड उघड दाखवली. काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आणि शेवटी निवडणूक आयोगाने या दोघांना अपात्र ठरवले.

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात बलदेवसिंह राजपूत यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रीलंका बॉम्बस्फोट : आयसिसने स्वीकारली जबाबदारी, अज्ञात व्यक्तीची सीसीटीव्ही फुटेज समोर आले

News Desk

कोरोनावर मात करण्यासाठी भारताला वर्ल्ड बॅंकेने दिले आर्थिक सहाय्य

News Desk

‘भारतात सर्व छान चालले आहे,’ ‘हाऊडी मोदी’ला पंतप्रधान मोदींचे उत्तर

News Desk