HW News Marathi
देश / विदेश

अनेक पातळीवरून केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

केरळ | केरळमध्ये पावसाच्या थैमानामुळे आतापर्यंत ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. केरळवर ओढावलेलं हे संकट पाहून सध्या सर्व स्तरामधून त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे होत आहे. सरकार व्यतिरिक्त सार्वजनिक पातळीवरूनही केरळ येथील पूरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी विविध पद्धतीने लोकांना आवाहन केले जात आहे.

गेल्या 100 वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचाओघ सुरु झाला आहे. मुंबईतील विक्रोळी कन्नमवार नगर परिसरातील एम के ट्रस्ट माध्यमिक विद्यालयात म्यूस, रॉट्रक्ट, अनबोड कोची या तीन संस्थानी मिळून विक्रोळी, ठाणे, मुलुंड, वाशी अश्या प्रकारे १२ सेंटर सुरू केले आहेत. पुरग्रस्तांसाठी तेल, ब्रेड, पार्ले बिस्कीट, तांदूळ, चहा पावडर, साखर, बिस्लेरी पाणी बॉटल, डेटॉल, कपडे, सॅनेटरी नॅपकिन्स, भांडी, साबण, रेनकोट, छत्री, चप्पल, टॉवेल, पांघरुण, बकेट, टॉर्च इत्यादी अश्या मूलभूत गरजेच्या साधनांची सोशल मीडिया मार्फत मदत मागून ही संस्था मदत करणार असल्याचे मिहीर चव्हाण यांनी एच डब्लूशी बोलताना सांगितले.

अनेक पातळीवरून मदतीचे आवाहन –

सीएमडीआरएफ म्हणजेच केरळ सरकारचे चिफ मिनीस्टर डिट्रेस रिलिफ फंड यांच्याकडूनही आर्थिक आणि गरजेच्या वस्तूंच्या मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. सरकार व्यतिरिक्त सार्वजनिक पातळीवरूनही केरळ येथील पूरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी विविध पद्धतीने लोकांना आवाहन केले जात आहे. पेटीएम अॅप, अॅमेझॉनवर क्लिक करा आणि पाठवा केरळच्या पूरग्रस्तांना मदत मनी ट्रान्सफर अॅप ‘पेटीएम’ द्वारे लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. पेटीएम अॅप उघडल्यानंतर स्क्रिनवर अकरा पर्याय दिसतील. त्यापैकी एक पर्याय म्हणजे Kerala Floods (केरळ फ्लड) असा आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर अगदी साध्या पद्धतीने आपण केरळ पुरग्रस्तांना मदत करु शकतो.

अॅमेझॉनतर्फे केरळ पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन –

अॅमेझॉनतर्फे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्ती पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे येत त्यांच्या गरजेचे सामान मागवण्याची संधी मिळणार आहे. अॅमेझॉन इंडिया या अॅपच्या होमपेजवर हा पर्याय उपलब्ध असून, डेस्कटॉप आणि जगातील इतर युजर्ससाठी bit.ly/amazonkerala ही लिंक देण्यात आली आहे. ज्यावर जाऊन ते केरळसाठी मदतीचा हात देऊ शकतात. आम्हाला विश्वास आहे की तुमच्या सहकार्याने पूरग्रस्तांची मदत करण्यासाठी आम्हीही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकू’, असं आवाहन अॅमेझॉनतर्फे करण्यात आलं आहे. विविध सामाजिक संस्थांच्या मदतीने अॅमेझॉनवरुन कपडे, दैनंदिन गरजेच्या वस्तू जसे; भांडी, साबण, रेनकोट, छत्री, चप्पल, टॉवेल, पांघरुण, सॅनेटरी नॅपकिन्स, बकेट, टॉर्च इत्यादी काही वस्तू आपल्याला पुरग्रस्तांना पुरवता करता येतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आनंदी राष्ट्रासाठी विकासाचे प्राधान्य ठरविणे महत्वाचे !

News Desk

क्षुल्लक गोष्टींचे राजकारण नको, अमित शहांनी राहुल गांधींना सुनावले 

News Desk

जेव्हा सर्वोच्च न्यायालय पगार वाढीवर बोलते…

News Desk