नवी दिल्ली | भारताचे लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी बेंगळुरूमध्ये सुरू असलेल्या पाच दिवसीय ‘एअर शो’दरम्यान गुरुवारी (२१ फेब्रुवारी) स्वदेशी ‘तेजस’ विमानातून उड्डाण केले. ‘हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेड’ने या विमानाची निर्मिती केली आहे. “तेजस एव्हीओनिक्स खूप उत्तम असून त्याची शत्रूशी दोन हात करण्याची ताकदही प्रचंड आहे”, असे बिपीन रावत यांनी यावेळी म्हटले.
#WATCH Chief of the Army Staff General Bipin Rawat after taking a sortie in Light Combat Aircraft – Tejas in Bengaluru. pic.twitter.com/OOqlAARRWm
— ANI (@ANI) February 21, 2019
“तेजसमधून उड्डाणाचा अनुभव माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे. या घटनेचा मी साक्षीदार आहे. तेजसचे एव्हीओनिक्स उत्तम असून शत्रूला लक्ष्य करण्याची ताकदही प्रचंड आहे. हे एक आश्चर्यकारक विमान असून यामुळे भारताच्या वायूसेनेची ताकद वाढेल”, असे बिपीन रावत माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी ‘तेजस’ विमानाला मिलिट्री एव्हिएशन रेग्यूलेटरकडून मिळालेले फायलन ऑपरेशन क्लिएरन्सचे प्रमाणपत्र वायुसेनाप्रमुख बी.एस. धनोआ यांच्याकडुन सोपविण्यात आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.