HW News Marathi
देश / विदेश

लष्करी अधिकारी मारवाहला हनी ट्रॅपच्या जळ्यात

नवी दिल्ली | भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्याने देशाशी गद्दारी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आले आहे. हवाई दलातील अधिकारी अरुण मारवाह असे या अधिकाऱ्याचे नाव असून पाकिस्तानने यांना हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले होते. मारवाह भारतीय हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन आहेत. भारतातील गोपनिया माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागाला (आयएसआय) दिली आहे. हनी ट्रॅप प्रकरणात मारवाहला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे.

आयएसआयने फेसबुकवरुन एजेट किरण रंधवा हिने मॉडेल असल्याचे सांगून मारवाहल यांना भुरळ घातली. आठवडाभर अश्लिल गप्पा मारल्यानंतर त्यांनी आयएएफच्या युध्द सरावाची माहिती देण्यास तयार झाले. मारवार यांनी हवाई दलाच्या मुख्यालयातून मोबाइलवर महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढून ते व्हॉट्सअॅपवरुन आयएसआयला माहिती पाठवित असल्याची माहिती स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी दिली.

काही दिवसांपासून मारवालांच्या हलचाली संशयास्पद वाटल्यामुळे ३१ जानेवारी रोजी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. आयएसआयने फेसबुकवरुन अरुण मारवाहला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०२०चा अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांना जाहीर

News Desk

महिलेला निर्वस्र करून भाजप नगरसेवकाचा कहर..

News Desk

“दादरा नगर हवेलीतील खासदार भाजपात येईल”- नारायण राणे

News Desk