नवी दिल्ली | देशात कोरोना व्हायरसच्या संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यावेळी देभरातील सर्वा वाहतूक सेवा बंद ठेवण्या आल्या आहेत. मात्र, देशातील इतर राज्यात श्रमिक, कामगार आणि विद्यार्थी अडकून पडलेले होते. त्या सर्वांना त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी भारतीय रेल्वे टप्प्याटप्प्याने करण्यास येण्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि रेल्वे मंत्रालयाकडून आता सर्वसामान्यांसाठी विशेष पॅसेंजर ट्रेन्स सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
As per the railway officials, total 45,533 PNRs have been generated and reservation issued to 82,317 passengers for special trains. The total collection is Rs 16,15,63,821 pic.twitter.com/O1u83CnepP
— ANI (@ANI) May 12, 2020
अखेर रेल्वेकडून प्रवासाठी अधिकृत संकेतस्थळावरुन तिकीट विक्रीस सुरुवात करण्यात आली. स्पेशल रेल्वे सुविधेअंतर्गत जवळपास ८२, ३१७ प्रवाशांनी आरक्षित तिकीटे देण्यात आली आहेत. या प्रक्रियेदरम्यान, ४५,५३३ पीएनआरही देण्यात आले. तेव्हा १६,१५,६३,८२१ रुपये इतकी घसघशीत कमाई रेल्वेच्या खात्यात जमा झाली आहे. रेल्वेच्या या कमाईने गेल्या महिन्याभराहून ठप्प असलेल्या रेल्वेच्या कामाईने अनेकांच्या भुवया उंचावत आहे.
IRCTC वेबसाईट क्रॅश
या ट्रेन्ससाठीचे ऑनलाईन बुकिंग काल (११ मे) दुपारी ४ वाजता आयआरसीटीसी (IRCTC)च्या वेबसाईटवर सुरु होणार होते. मात्र, देशभरातील अनेक इच्छुक प्रवाशांकडून एकाच वेळी तिकीट बुकिंगसाठी प्रयत्न झाल्याने अवघ्या काहीच मिनिटांत IRCTCची वेबसाईट क्रॅश झाली. त्यानंतर, केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून याबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. “वेबसाईटवर ताण आल्याने थोड्याच वेळात विशेष पॅसेंजर ट्रेनचे तिकीट बुकिंग पुन्हा सुरु करण्यात येईल”, असे ट्विट करत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांचा गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर, संध्या. ६ वाजता विशेषसाठीच्या तिकीट बुकिंगला पुन्हा सुरुवात करण्यात आली. या संकेतस्थळाच्या मदतीने हजारो प्रवाशांनी इच्छित स्थळी जाण्यासाठीची तिकीटे आरक्षित केली. काही तासांतच काही रेल्वे गाड्यांची आरक्षणे संपलीसुद्धा. हावडा – दिल्ली या एक्स्प्रेस गाडीतील फर्स्ट एसी आणि थर्ड एसी क्लासमधील सर्व तिकीटे अवघ्या १० मिनिटांत विकली गेल्याचे रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले होते.
संबंधित बातम्या
जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.