जोधपूर | अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जोधपूर न्यायालयात आसाराम बापूला थोड्याच वेळात शिक्षा सुनावली जाणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर जोधपूरपासून ते दिल्लीपर्यंत कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. रस्ते, रेल्वे स्थानक, बस स्टॅन्डला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
- नेमके काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेशमधील शाहजहापूरमध्ये राहाणारी मुलगी आसारामबापूच्या गुरूकुलमध्ये शिकत होती. ६ ऑगस्ट २०१३ रोजी तिच्या पोटात दुखत होते त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. बापूंच्या एका साधक महिलेचे सांगितले की, तिला भूत लागले आहे. आणि हे भूत फक्त आसाराम बापूच उतरवू शकतात. त्यानंतर पीडित मुलीला आसाराम बापू यांच्या जोधपूर आश्रमात नेण्यात आले. त्यानंततर १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ रोजी या दोन रात्री तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पडिती मुलीने केला. बलात्काराची कोठेही वाच्यता न करण्यासाठी तिला धमकी देण्यात आली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.