जयपूर | राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना पदावरून हटवल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाईलाजाने आम्हाला सचिन पायलट यांना पदावरून काढण्याचा निर्णय घ्यावा लागला असे म्हटले.
बऱ्याच काळापासून भाजप कट रचत होते, आणि निर्णय घेण्यास भाग पाडत होते. आम्हाला माहीत होते की हा एक मोठा कट आहे. आमचे मित्र चूकले आणि दिल्लीला गेले, असे अशोक गेहेलोत म्हणाले.
तसेच, सचिन पायलट यांच्या हातात काही नाही आहे, हे सर्व भाजप चालवत आहे. भाजपने तो रिसॉर्ट आणि बैठक आयोजित केली आणि ते सर्व काही सांभाळत होते. मध्य प्रदेशात काम करणारी हीच टीम येथे कार्यरत होती, असा आरोप अशोक गेहलोत यांनी भाजपवर केला आहे.
अशोक गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतल्यानंत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक गेहलोत यांनी राज्यपालांना गेल्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींची तसंच सचिन पायलट यांनी पुकारलेल्या बंडाची माहिती दिली.
गेल्या अनेक दिवसांपासून घोडेबाजार सुरु असल्याने हाय कमांडने निर्णय घेणं गरजेतं होतं. हे खूप मोठं षडयंत्र होतं हे आम्हाला माहिती आहे. यामुळे आमचे काही मित्र मार्गापासून भरकटले असून दिल्लीला गेले आहेत,” असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.
High command was compelled to take the decision because since a long time BJP was conspiring and resorting to horse-trading. We knew it was a big conspiracy; now some of our friends went astray because of it and went to Delhi: Rajasthan CM Ashok Gehlot pic.twitter.com/V4s8nRvc1A
— ANI (@ANI) July 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.