HW News Marathi
देश / विदेश

गोव्यात सोपटेंनी मराठी तर शिरोडकरांनी कोकणी भाषेतून घेतली शपथ

पणजी | गोव्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये चार विजयी आमदारांचा शपथ विधी सोहळा काल (२८ मे) पार पडला. यात मांद्रे मधून भाजपच्या दयानंद सोपटे यांनी मराठीमधून आमदारकीची शपथ घेतली. तर भाजपच्या सुभाष शिरोडकर यांनी कोकणीमधून शपथ घेतली. काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरात आणि भाजपच्या जोशुआ डिसोझा यांनी इंग्रजीमधून शपथ घेतली. हा शपथ विधी सोहळा भवनातील पीएसी सभागृहात पार पडलला.

गोव्यात लोकसभेबरोबर विधानसभेच्या चार पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे पणजीची, माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या निधनामुळे म्हापशाची तर दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मांद्रे आणि शिरोडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका पार पडल्या होत्या. मांद्रे, म्हापसा आणि शिरोड्यात भाजप तर राजधानी पणजीमध्ये भाजपचा २५ वर्षांचा गड काबीज करून काँग्रेसने विजय मिळवला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारत दहशतवादाने त्रस्त, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध

Gauri Tilekar

दिल्लीत आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात

News Desk

#Article370Abolished : तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

News Desk