ब्रिटन | जगावर सध्या नव्या कोरोनाच्या प्रकाराचे सावट गडद होऊ लागलं असतानाच एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या नव्या प्रकाराचा सामना करत असलेल्या ब्रिटनने ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकाकडून तयार करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीला मान्यता दिली आहे. यासोबतच ब्रिटन कोरोना लसीला मान्यता देणारा पहिला देश ठरला आहे. रॉयटर्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे. त्यामुळे एकीकडे ब्रिटनमधून चिंताजनक बातमी येत असताना ही एक आनंदाची बातमीही आली आहे.
ब्रिटनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात करोनाचा नवा प्रकार फैलावत असून अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणले आहेत. ब्रिटन सध्या करोनाशी लढा देत असतानाच लसीला मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, “औषधं आणि हेल्थकेअर उत्पादनं नियामक प्रशासनाने (MHRA) ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी/ अॅस्ट्राजेनेकाच्या करोना लसीसंबंधी केलेल्या शिफारसीला सरकारने मान्यता दिली आहे”. अॅस्ट्राजेनेका आणि कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्यांनी कोरोनाचा नवा प्रकार किती प्रभावी आहे याचा अभ्यास करत असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी करोनाची लस नव्या प्रकारावरही उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
Authorisation recommends 2 doses administered with an interval of b/w 4 and 12 weeks. This regimen was shown in clinical trials to be safe & effective at preventing symptomatic COVID-19, with no severe cases & no hospitalisations more than 14 days after second dose: AstraZeneca https://t.co/k1IdgiE46J
— ANI (@ANI) December 30, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.