HW News Marathi
Covid-19

इंदूरमध्ये डाॅक्टरांवर हल्ला ! नेमकं काय झालं ,जाणून घ्या ..

आरती मोरे | भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे सतत वाढत आहेत. मध्य प्रदेश राज्यात इंदूर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सध्या इंदूर शहरात 75 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस सरकार आणि डॉक्टरांची टीम या साथीचा सामना करत आहेत . पण असे काही लोक आहेत ज्यांनी डाॅक्टरांना मारहाण केली आणि दगडफेक करण्यास सुरवात केली

खरं तर, बुधवारी आरोग्य विभागाचे एक पथक एका आजारी महिलेच्या तपासणीसाठी रानीपुरा भागात आली होते, तेव्हा काही लोकांनी पथकावर दगडफेक केली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राणीपुरा परिसरातील वैद्यकीय विभागाची टीम कोरोनाविषाणूच्या संशयित वृद्ध महिलेची तपासणी करण्यासाठी टाट पट्टी बखल येथे गेली. त्यानंतर लोकांनी वैद्यकीय पथकावर हल्ला केला. त्यांच्यावर दगडांनी वर्षाव करण्यात आला आणि त्यांना ठार मारण्यात आले. या पथकात डॉक्टर, परिचारिका यांचा समावेश होता.

डाॅक्टरांना मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात डाॅक्टरांवर दगड आणि काठीने त्यांच्यावर हल्लाकसा केला जातोय हे स्पष्टपणे पाहता येत आहे. आणि वैद्यकीय पथक आपला जीव वाचवून पळून जाताना दिसत आहेत.

ही टीम एका वृद्ध महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. यामुळे येथे मोठ्या संख्येने लोक जमा झालेआणि त्यांनी वादविवाद सुरू केले. पटवून दिल्यानंतरही त्या लोकांनी ऐकलं नाही आणि त्यांनी पोलिस बॅरिगेट्स तोडले आणि दगडफेककरण्यास सुरवात केली.

व्हिडिओ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश !

Arati More

जाणून घ्या…मुंबई-पुण्यामधून कोणत्या राज्यासाठी धावणार रेल्वेच्या विशेष ट्रेन

News Desk

शरद पवार यांनी ‘या’ कारणासाठी रेल्वे मंत्र्यांचे मानले आभार

News Desk