उत्तरप्रदेश| देशातील वाढत्या कोरोना रूग्ण संख्येने चिंता वाढत चालली आहे. या वाढत्या प्रकोपामुळे अनेक नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना फैलाव पाहता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं रामनवमीला राम जन्मभूमी मंदिरात भक्तांना प्रवेश बंदी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रनं ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
कोरोना महामारी के बढ़ते प्रभावों को ध्यान में रखते हुए न्यास द्वारा यह निर्णय लिया गया है कि श्रीरामनवमी के दिन श्रीराम जन्मभूमि परिसर में प्रभु श्री रामलला जी का जन्मोत्सव परंपरागत रूप में मुख्य पुजारी जी के मार्गदर्शन में मनाया जाएगा, परंतु सभी भक्तों का प्रवेश वर्जित रहेगा।
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) April 19, 2021
कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे राम जन्मभूमी परिसरात प्रभू रामांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. मात्र या जन्मोत्सव सोहळ्याला भक्तांना परवानगी नसेल.’, असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून ट्विटरवर सांगण्यात आलं आहे.
राम जन्मभूमीत रामनवमीला जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अयोध्या नगरीला आकर्षक रोषणाई केली जाते. मंदिर परिसर फुलांनी सजवला जातो. या सोहळ्याला भक्तही मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र कोरोनामुळे अयोध्येत भक्तांना परवानगी नाकारण्यात आली आहे. अयोध्येतील संत समाजाने नागरिकांना घरीच रामजन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.