HW News Marathi
देश / विदेश

Ayodhya Verdict : ५ सदस्यीय खंडपीठात ३ मराठी न्यायाधीशांचा समावेश

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय खंडपीठापुढे अयोध्या जमीन वादावर सुनावणी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या ५ सदस्यीय खंडपीठामध्ये तीन मराठी न्यायाधीशांचा समावेश आहे. या पाच सदस्यीय खंडपीठामधील न्या. शरद बोबडे, न्या. उदय उमेश लळित आणि धनंजय चंद्रचूड या मराठी न्यायमूर्तींचा समावेश आहे. या खंडपीठासमोर उद्यापासून (१० जानेवारी) सुनावणी अपेक्षित आहे.

अयोध्या जागेच्या वादाप्रकरणी २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकांविरोधात नव्या पीठाकडून सुनावणी होईल, असे ४ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. ‘हे राम जन्मभूमीचे प्रकरण आहे. या प्रकरणी नव्या पीठाचे गठन होणार असल्याने आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. ही सुनावणी १० जानेवारी रोजी होणार आहे,’ असे सरन्यायाधीश रंजन गोगोईंनी त्यावेळी म्हटले होते.

या वादग्रस्त जमीन रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड अशा तीन पक्षकारांमध्ये विभागण्यात यावी, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. या निर्णयाविरोधात १४ याचिका दाखल झाल्या होत्या. या प्रकरणाची सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घटनापीठाकडून करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबरला स्पष्ट केले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्राबाबूंनी खासदारांना भाजपमध्ये पाठवले | वायएसआर काँग्रेस

News Desk

चीननं खुपसला त्यांच्या नोबेल विजेत्याच्या पाठीत खंजीर

News Desk

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी, गुप्तचर यंत्रणांची माहिती

Gauri Tilekar