मुझफ्फरपूर | बिहारमधील मुझफ्फरपूरमधील बाबा गरीबनाथ मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने दर्शनासाठी गेलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत २५ भाविक जखमी झाले असून लहान मुले आणि महिलांचा जखमींमध्ये समावेश आहे.
15 people have got injured in a stampede at Garibnath Temple in Muzaffarpur, this morning. The situation is now under control. #Bihar pic.twitter.com/d8yR7FaicD
— ANI (@ANI) August 13, 2018
श्रावणी सोमवारनिमित्ताने बाबा गरीबनाथ मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी केली होती. बाबा गरीबनाथ मंदिरातील गर्दीवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात २५ भाविक जखमी झाले असून जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मंदिरातील परिस्थती नियंत्रणास आण्यास मुझफ्फरपूर प्रशासनाला यश आले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.