HW News Marathi
देश / विदेश

पोलीस भरतीत आलेल्या उमेदवारांना घृणास्पद वागणूक

धार | पोलीस भरतीच्या वेळीत करण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणीत हवालदार पदासाठी आलेल्या आरक्षित उमेदवारांच्या छातीवर एससी आणि एसटी असे लिहिण्याचा धक्कादायक प्रकर घडकीस आला. हा सर्व प्रकार मध्यप्रदेशमधील धार जिल्ह्यात आरक्षित जागेसाठी सुरु असलेल्या पोलीस भरतीत झाला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सर्व स्तरातून सरकारवर टीकेची झोड उठली आहे.

पोलीस भरतीच्या आरक्षित ओबीसी-एनटीसाठी १६८ आणि एस-एसटी १६५ जागेसाठी आरोग्य तपासणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या ओळखीसाठी जिल्हा रुग्णालयाने उमेदवारांच्या छातीवर त्यांची जात नमूद करण्यात आली. ‘गेल्या वेळी उमेदवारांची आरोग्य तपासणी होत असताना काही चूका झाल्या. अशा चुका पुन्हा होऊ नयेत, यासाठी रुग्णालयाने असे केले का हे तपासण्यात येत आहे. मात्र, रुग्णालयाने असे नेमके कशासाठी केले याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल असेही पोलीस अधीक्षक वीरेंद्र सिंह म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विवाह बाह्य संबंध आता अपराध नाही, कलम ४९७ रद्द

News Desk

दहशतवादी आणि आपल्या गुप्तचर यंत्रणा एकसमान – माजी राॅ एजंट विनोद साहनी

News Desk

महसुली तूट भरुन काढण्यासाठी केंद्राकडून १७ राज्यांना ९,८७१ कोटींचा निधी वितरित

Aprna