HW News Marathi
देश / विदेश

बायडेन विजयाच्या उंबरठ्यावर, ट्रम्प यांचा ‘तो’ निर्णय बायडेन मागे घेण्याची शक्यता

अमेरिका | अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तेथील मतदार वर्ग राजकीय दृष्ट्या दुभंगल्याचे स्पष्ट झाले. भारतीय वेळेनुसार उशिरापर्यंत ५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २२४, तर ट्रम्प यांना २१३ मते मिळाली होती. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे. बायडेन हे विजयाच्या अगदी जवळ असून तुलनेने ट्रम्प बरेच मागे पडले आहेत.

अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुकीमध्ये चुरस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जागतीक महासत्ता असलेल्या अमेरिकेतील नागरिक राजकीय दृष्ट्या दुभंगल्याचे चित्र आतापर्यंतच्या मतमोजणीमध्ये दिसत आहे. विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांना आव्हान देणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन या दोघांनी आपापले पारंपरिक मतदार गड राखले असले तरी काही महत्वाच्या राज्यांमध्ये अद्याप मतमोजणी सुरु असल्याने लढत अधिक रंजक झाली आहे.

५३८ प्रातिनिधिक मतांपैकी (इलेक्टोरल व्होट्स) बायडेन यांना २६४, तर ट्रम्प यांना २१४ मते मिळाली आहेत. विजयासाठी २७० प्रातिनिधिक मतांची आवश्यकता आहे. बायडेन हे विजयाच्या अगदी जवळ असून तुलनेने ट्रम्प बरेच मागे पडले आहेत. त्यामुळेच बायडेन आणि त्यांच्या समर्थकांचा उत्साह वाढला असून बायडेन यांनी विजय टप्प्यात आलेला असतानाच विजयाची औपचारिक घोषणा पूर्ण होण्याआधीच सत्तेत आल्यानंतर ७७ दिवसांमध्ये हवामान बदलविषयक पॅरिस करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होईल असं म्हटलं आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०१७ मधून या करारामधून माघार घेतली होती. याच घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. याचपार्श्वभूमीवर एबीसी न्यूजने केलेल्या एका ट्विटवर बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आजच्याच दिवशी ट्रम्प यांच्या सरकारने पॅरिस करारामधून माघार घेतली होती. मात्र पुढील ७७ दिवसांमध्ये बायडेन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका पुन्हा या करारामध्ये सहभागी होईल,” असं बायडेन यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांची हार काही अंशी निश्चित दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केल्या ‘या’ १२ घोषणा

News Desk

शताब्दी एक्स्प्रेसची बोगी जळून खाक,सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले 

News Desk

‘ब्लॅक फंगस’चा कहर! साथीचा आजार म्हणून जाहीर, केंद्र सरकारच्या राज्यांना सुचना

News Desk