वॉशिंग्टन | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. इम्रान अमेरिकेत दाखल झाल्यापासून त्यांना अपमानाचा सामना करावा लागत आहे. इम्रान रविवारी (२१ जुलै) एका ऑडिटोरियममध्ये आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना स्वतंत्र बलुचिस्तानच्या समर्थकांनी सभागृहात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळानंतर त्या तरुणांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले.
#WATCH Baloch activists disrupt Pakistan PM Imran Khan’s speech during a community event in Washington DC, USA. pic.twitter.com/S9xdXF1yt8
— ANI (@ANI) July 22, 2019
या गोंधळाचा परिणाम इम्रान यांनी त्यांच्या भाषणावर होऊ दिला नाही, आणि भाषण सुरूच ठेवले.अमेरिकेत राहणारे बलुचिस्तानी नागरिक पाकिस्तानकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात सातत्याने आवाज उठवत आहेत. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा आरोप बलुचिस्तानी नागरिकांकडून सातत्याने करत आहेत.
पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेल्या इम्रान यांच्या स्वागताला प्रशासनातील एकही मोठा नेता आला नव्हता. त्यामुळे सध्या ट्विटरवर इम्रान यांची खिल्ली उडवली जात आहे. इम्रान कतार एअरवेजच्या विमानाने सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे अमेरिकेत पोहोचले होते. कतार एअरवेजच्या विमानातून अमेरिकेत दाखल झालेल्या इम्रान यांचा व्हिडीओ पीटीआयने ट्विट केला आहे. यामध्ये खान एका सामान्य व्यक्तीसारखे विमानातून उतरताना दिसत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.