HW News Marathi
देश / विदेश

सगल तीन दिवस बँका रहाणार बंद

मुंबई | जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यात पुन्हा एकदा १२ ते १४ जानेवारी असे सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्ट्यांमुळे बँक व्यवहार बंद राहणार आहेत. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच नागरिकांना दुस-या आठवड्याच्या सुरुवातीलाच महत्त्वाचे व्यवहार आटोपण्याचे आवाहन बँक कर्मचारी संघटनेने केले आहे, जेणेकरून तिस-या आठवड्यात ग्राहकांना अधिक त्रास सहन करावा लागणार नाही.

१२ जानेवारीला दुसरा शनिवार, १३ जानेवारीला रविवार आणि १४ जानेवारीला मकरसंक्रांत आणि पोंगल सणांमुळे बँक कर्मचा-यांना सुट्टी असेल. परिणामी, रोख व्यवहारांसह धनादेश वठणावळही बंद असेल. एकंदरीतच रोख रकमेसाठी शनिवारी व रविवारी ग्राहक बँक एटीएमवर उड्या घेतील. त्यामुळे ऐन सणासुदीत रोख रकमेची चणचण जाणवू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सततच्या निवडणुकीमुळे संसदेचे अधिवेशन आणि चर्चा प्रभावित; ‘वन नेशन वन इलेक्शन’ पंतप्रधानांकडून इशारा

Aprna

पेगॅसस प्रकरणी नैतिकतेच्या आधारे मोदी सरकारने राजीनामा द्यावा! – नाना पटोले

Aprna

अनिल देशमुखयांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, धक्का मिळणार की दिलासा?

News Desk