HW News Marathi
Covid-19

BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या भावाला कोरोनाची लागण, दादा झाले होम क्वारंटाइन 

कोलकाता |  BCCI अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या मोठ्या भावाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सौरभ गांगुली कालपासून होम क्वारंटाइन आहेत. स्नेहाशीष गांगुली हे बंगाल क्रिकेट संघटनेच्या सहाय्यक सचिवपदी कार्यरत आहे.

तसेच , आरोग्यविषयक मार्गदर्शक नियमांनुसार सौरव गांगुलीलाही घरात क्वारंटाइन व्हावे लागणार आहे, अशी माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.

”मागील काही दिवसांपासून स्नेहाशीष यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांना बेल्ले व्ह्यू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री त्यांचा कोरोना अहवाल आला. ते पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सुरक्षिततेची काळजी म्हणून गांगुलीला होम क्वारंटाईन व्हावं लागणार आहे,”असे बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive | विदेश बहोत देख लिया, अब अपना देश देख लो !

News Desk

पंतप्रधानांकडून आत्मनिर्भर भारतासाठी २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर

News Desk

आवाजावरून कोरोना चाचणी करणे आता होणार शक्य !

News Desk