नवी दिल्ली | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जारी केला होता. त्याचा कालावधी आज (१४ एप्रिल) संपणार आहे. त्यामुळे पंतप्रधान आज १० वाजता भारतीयांना संबोधित करणार आहेत. पण पंतप्रधानांच्या संबोधनाआधीच कॉंग्रेसच्या अंतरीम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भारतीयंना संदेश दिला आहे. सोनिया गांधी यांनी ट्विटरवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
संदेश देण्याच्या सुरुवातीलाच त्यांनी देशवासीयांना या लॉकडाऊनच्या काळात त्यांनी जो संयम पाळला त्यासाठी सगळ्यांचे त्यांनी आभार मानले आहे. डॉक्टर, नर्से, आरोग्य विभाग, अत्यावश्यक सेवा या सगळ्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले आहे. तसेच, तुम्ही सगळे लॉकडाऊनचे नियम पाळत असाल अशी मी आशाही करते. आवश्यक काम असल्यास घराबाहेर जा, आणि मास्क, किंवा कपडा लावूनच बाहेर जा असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
लॉकडाऊनच्या काळात सर्व भारतीय एकमेकांना मदत करत आहेत. कोणी मास्क वाटत आहे, तरी कोणी अन्नधान्य पुरवत आहे. त्यांचेही आभार त्यांनी मानले. तसेच, कॉंग्रेस पक्षातील सर्व कार्यकर्ते तुमच्या मदतीसाठी कायम आहेत. कोणतीही मदत लागल्यास कॉंग्रेसच्या कोणत्याही कार्यालयात जावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी का देश के नाम संदेश:-
कोरोना संकट में डॉक्टर्स, सफाईकर्मियों, पुलिस सहित सरकारी अधिकारियों के डटे रहने से बड़ी "देशभक्ति" कोई नहीं है। हम एकता, अनुशासन और आत्मबल के भाव से कोरोना को परास्त करेंगे। धैर्य एवं संयम के लिए देशवासियों का धन्यवाद। pic.twitter.com/Sl4zkKURTv— Congress (@INCIndia) April 14, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.