HW News Marathi
देश / विदेश

कोरोनापासून सावध राहा, इसिसने दिल्या दहशतवाद्यांना सूचना

मुंबई। कोरोना व्हायरसची दहशत जगभरातील देशांनी तर घेतलीच आहे. त्याचबरोबर आता जगातील कुख्यात दहशतवादी संघटना इसिसला (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) सुद्धा कोरोनाची धास्ती घेतली आहे. इसिसने त्यांच्या दहशतवाद्यांसाठी आरोग्यविषय सूचना जारी केल्याची धक्कादायक माहिती ‘अल नबा’ या वृत्तपत्रातून मिळाली आहे.

वृत्तापत्रातून मिळालेल्या माहितीनुसार कोरोनाची बाधित लोकांपासून दूर रहावे, हात धुवून अन्न खावे आणि युरोपला जाऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. इसिसने दहशतवाद्यांना तोंडाला मास्क लावा किंवा तोंड झाकून ठेवा, शिंकताना तोंडावर हात ठेवा अशा सूचना दिल्या आहेत. याचबरोबर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इसिसकडून दहशतवाद्यांना युरोप प्रवास करण्यास मज्जा करण्यास सांगितले आहे.

सध्या तरी इसिसचे वर्चस्व असलेल्या इराक-सीरियामध्ये अद्याप कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले नाही. पण, इराकमध्ये ७९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सीरियामध्ये कोणालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे समजते. मात्र, या ठिकाणी कोरोना पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच सीरियामध्ये कोणालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे समजते. मात्र, या ठिकाणी कोरोना पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांना UPAच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्याचा अधिकार नाही !, नाना पटोलेंनी सुनावले

News Desk

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? कॉंग्रेसच्या या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणतात…

News Desk

आज नॅशनल फूड डे, भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ कोणता ?

Gauri Tilekar