HW News Marathi
देश / विदेश

विरोधी पक्षाच्या मागणीमुळे ईव्हीएममध्ये मोठा बदल

मुंबई। इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन अर्थात ईव्हीएममध्ये घोटाळा केला जाऊ शकतो याचे प्रात्यक्षिकच (डेमो) काही पक्षाकडून दिल्ली विधानसभेत दाखविले. सिक्रेट कोडच्या सहाय्याने सहजपणे हा झोल करता येतो असा दावा यावेळी करण्यात आला. विरोधी पक्षांचा या डेमोमुळे ईव्हीएममध्ये घोटाळ्याच्या आरोपांना पुन्हा पुष्टी मिळाली होती.त्यामुळे अनेक आरोपानंतर आता EVM बदलली आहे.

– निवडणूक आयोगाने केला बदल

– मत दिल्यानंतर आता मतदाराला स्लिप पाहता येणार

– मुंबईभर 26 पथके दररोज करणार EVM बाबत जागृती.

नव्या मशिनची मुंबईतील २६ मतदारसंघातील लोकांना खात्री करून घेता येणार आपण कोणाला मत दिले आहे आता झालेल्या पाच राज्यातील निवडणूकित ही ह्या नवीन EVM आणि VVPAT मशीनचा वापर झाला आहे.त्यामुळेच आता कोणाला ही ईव्हीएम पद्धतीवर शंका घेता येणार नाही. वांद्रे कलेक्टर ऑफिस येथून आज पाहिलं प्रात्यक्षिक आहे.या EVM बाबत राज्यात विविध ठिकाणी प्रात्यक्षिक मोहिमेचा आज शुभारंभाला सुरवात करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. या निवडणुकीत ‘ईव्हीएम’ घोटाळा झाल्याची चर्चा देशभर सुरू झाली. बहुजन समाज पक्ष, ‘आप’, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी ईव्हीएम घोटाळा होत असल्याचा आरोप केला, मात्र निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळले. ईव्हीएममध्ये फेरफार करून घोटाळा केला जाऊ शकत नाही. ज्यांना शंका आहे त्यांनी ईव्हीएममध्ये फेरफार करून दाखवावे असे आव्हान निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर विरोधी पक्षाने यांवर फेरफार करून दाखवले कसे होते ते त्यांवर लक्ष देत निवडणूक आयोगाने यात मोठा बदल केला आहे.

यामुळे आपण मत दिल्यानंतर लगेचच आपल्या शेजारी असलेल्या VVPAT मशीन मध्ये सात सेकंदासाठी आपण कोणाला मत दिले आहे त्याची रिसीप्ट वर त्या पक्षाचे चिन्ह नाव वैगरे दिसणार आहे.ते बॅलेट पेपरच्या स्वरूपात त्या मशीनमध्ये जमा होईल त्यानुसार मत ईव्हीएममध्ये दिसणार आहे. त्यामुळेच आता पाच राज्यात जशा पारदर्शक निवडणूका झाल्या तशा येणाऱ्या आगामी निवडणूकित या ईव्हीएमचा वापर होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंतरराष्ट्रीय वेबसाईट्सना जगभरात Error, ‘या’ साईट्स ओपनच होईनात…

News Desk

भारतातील ‘या’ राज्यात आढळला कोरोना व्हायरसचा दुसरा रुग्ण

News Desk

ज्योतिरादित्य सिंधिया ट्विटरच्या बायोमुळे पुन्हा एकदा चर्चत

News Desk