नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पाठोपाठ आता भाजपन आणि कॉंग्रेसनेही स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने ३० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव पहिल्या स्थानावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नावे या यादीमध्ये आहेत.
स्टार प्रचारकांच्या यादीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही नाव आहे. त्यांच्या व्यतिरिक्त भाजपाची सत्ता असलेल्या अन्य कुठल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा स्टार प्रचारकांमध्ये समावेश केलेला नाही. पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज बिहारमध्ये पहिली सभा घेतली. “मोदी हैं तो मुमकीन हैं, नितीश हैं तो संभव हैं” असा नारा नड्डा यांनी गया येथील सभेत दिला आहे.
BJP releases a list of 30 star campaigners for upcoming #BiharElections2020
PM Modi, Home Minister Amit Shah, Defence Minister Rajnath Singh, party president JP Nadda, Union Minister Smriti Irani, UP CM Yogi Adityanath, Devendra Fadnavis and other leaders included in the list. pic.twitter.com/iKfGicyFLt
— ANI (@ANI) October 11, 2020
काँग्रेसच्या स्टार प्रचारकांचीही यादी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि खासदार राहुल गांधी असणार आहेतच. शिवाय गुलाम नबी आझाद, सचिन पायलट आणि शत्रुघ्न सिन्हा यांचाही या यादीत समावेश आहे. याशिवाय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अशोक गेहलोत, तारिक अन्वर, रणदीप सुरजेवाला हे सगळेही स्टार प्रचारक असणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.