HW News Marathi
देश / विदेश

BiharElection : बिहारच्या जनतेनं मतपेटीतून कुणाला कौल दिला जाहीर होणार काही तासात

पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. बिहार विधानसभेची सदस्यसंख्या २४३ असून, बहुमतासाठी १२२ जागां आवश्यक आहे. निवडणूक आयोगाकडून प्रत्येक जिल्ह्यात तीन मतमोजणी केंद्र ठेवण्यात आले आहेत.

बिहारमध्ये नेमकी कोणाची सत्ता येणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे. बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होण्यासाठी आता काही तासच उरले आहे. यामध्ये बिहारच्या जनतेचं भविष्य कोणाच्या हातामध्ये असणार याची प्रत्येकाला चिंता लागून आहे.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते (राजद) तेजस्वी यादव यांचे आज काय होणार, याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मतदानोत्तर एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये महागठबंधनचा दणदणीत विजय होऊन तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता प्रत्यक्ष निकाल जाहीर झाल्यानंतर हा अंदाज कितपत खरा ठरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर देशातील पहिलीच निवडणूक म्हणून बिहारच्या रणसंग्रामाकाडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीसाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) फार पूर्वीपासूनच तयारी केली होती. निवडणुकीपूर्वीच संयुक्त जनता दल (जदयू) आणि भाजपकडून बिहारच्या विकासाचा डंका पिटायला सुरुवात झाली होती.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर भाजपकडून या मुद्द्याचे राजकीय भांडवल करण्यासाठी पद्धतशीरपणे व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यामुळे अँटी-इन्क्बन्सी फॅक्टरचा फटका बसला तरी बिहारमध्ये नितीश कुमारांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असा होरा राजकीय तज्ज्ञांकडून बांधला जात होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… तशी भाषा शत्रू राष्ट्रांचे नेतेसुद्धा बोलू शकत नाही !

News Desk

काश्मीरमध्ये भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांची घरात घुसून दहशतवाद्यांनी केली हत्या

News Desk

इंद्रनील राजगुरू यांनी ‘आप’ला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये केली घरवापसी

Darrell Miranda