पाटणा | महाराष्ट्रात एकीकडे नवी मुंबईतील महानरपालिकाच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत तर दुसरीकडे बिहार विधानसभेच्या निवडणूकीचे वारे वाहत आहेत. बिहारच्या निवडणूकीतील मुख्यमंत्री पदाच्या लढतीत अनेक जण शर्यतीत आहेत. नितीश कुमार एनडीएकडून तर आरजेडी नेता तेजस्वी यादव हे दोन जण या पदासाठी शर्यतीत आहे. मात्र, या दोघांच्या शर्यतीत आता तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. अर्थात ही व्यक्ती राजकारणी नसली तरी राजकारणाशी तिच्या घराचे संबंध जुने आहेत. पुष्पम प्रिया चौधरी असे तिचे नाव असून जेडीयूच्या माजी विधान परिषदेचे सदस्य विनोद चौधरी यांच्या त्या कन्या आहेत.
८ मार्चला बिहारच्या वृत्तपत्रांतून एक जाहिरात छापून आली. या जाहिरातीत पुष्पम प्रिया चौधरी यांनी स्वत:ला बिहारच्या २०२० विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पदाची दावेदार म्हणून घोषित केले. दरम्यान,या जाहिरातीच्या माध्यमातून प्रिया यांनी ‘प्लुरल्स’ नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे. या पक्षाच्या त्या अध्यक्षा असून ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त पुष्पम प्रिया चौधरी यांनी जाहिरात देत आपली उमेदवारी जाहीर केली. पुष्मप प्रिया चौधरी यांनी जाहिरातीत सांगितलं की, त्यांनी परदेशातून शिक्षण घेतले आहे आणि आता त्यांना बिहारमध्ये परत येऊन बिहारचा कायापालट करण्याची इच्छा आहे. या जाहिरातीत पुष्मप प्रिया चौधरी यांनी, “जन गण सबका शासन”, असे नजर वेधून घेणारे वाक्यही लिहीले आहे.
Bihar needs pace, Bihar needs wings, Bihar needs change. Because Bihar deserves better and better is possible. Reject bullshit politics, join Plurals to make Bihar run and fly in 2020. #PluralsHasArrived #ProgressiveBihar2020 pic.twitter.com/GiQU00oiJv
— Pushpam Priya Choudhary (@pushpampc13) March 8, 2020
तसेच त्यांनी स्थापन केलेला हा पक्ष सकारात्मक राजकारण आणि योजना बनवण्याच्या विचारधारेवर केंद्रित आहे. पुष्पम प्रिया चौधरी यांनी जाहिरातीत बिहारच्या जनतेसाठी एक पत्रही लिहिले होते. यामध्ये, जर त्या बिहारच्या मुख्यमंत्री झाल्या तर २०२५ पर्यंत बिहारला देशातील सर्वात विकसित राज्य बनवतील आणि २०३० पर्यंत बिहार युरोपियन देशांसारखे असेल. त्यामुळे त्यांनी निवडणुकांमध्ये बिहारच्या जनतेचा पाठिंबा मागितला आहे.
कोण आहे पुष्पम प्रिया चौधरी?
पुष्पम प्रिया चौधरी या द्विपदवीधर आहेत. इंग्लंडच्या द इन्स्टीट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज विश्वविद्यालयातून त्यांनी एम.ए इन डेव्हलपमेंट स्टडीज आणि लंडन स्कूल ऑफ इकोनोमिक्स अॅण्ड पॉलीटिकल सायन्समधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये एमए केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.