HW News Marathi
Covid-19

‘राजीव गांधी फाऊंडेशन’ भाजपचा काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न, विचारले ‘हे’ १० प्रश्न

दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज (२७ जून) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. “कोरोना आणि भारत-चीनमधीन स्थितीमुळे सोनिया गांधी मुख्य प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारतीय सैन्य आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. तर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात देशही अगदी सुरक्षित आहे. त्यामुळे सोनिया गांधींना त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही”, असे जे.पी. नड्डा म्हणाले. त्याचप्रमाणे, ‘राजीव गांधी फाउंडेशन’च्या मुद्द्यावरून आता भाजप काँग्रेसला कात्रीत पकडण्याच्या तयारीत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने गांधी कुटुंबाला १० प्रश्न विचारले आहेत.

‘राजीव गांधी फाऊंडेशन’वरून भाजपचे काँग्रेसला ‘हे’ १० प्रश्न

१. ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला चीनकडून पैसे का मिळाले ?

२. युपीए सरकारच्या कार्यकाळात देशाचा चीनसोबतचा व्यापार का वाढला?

३. राजीव गांधी फाउंडेशनला लक्झमबर्गकडून पैसे का मिळाले?

४. पंतप्रधानांची राष्ट्रीय सहाय्यता निधी जनतेच्या सेवा आणि मदतीसाठी आहे. त्यातून राजीव गांधी फाउंडेशनला २००५-०८ पर्यंत पैसे का मिळाले? देशाच्या जनतेने त्यासाठी आपल्या कष्टाचे पैसे दिलेत. जनतेला याचे उत्तर जाणून घ्यायचे आहे.

५. यूपीए सरकारच्या काळात राजीव गांधी फाउंडेशनला पैसे देण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्रालये, सेल, एसबीआय यावर दबाव आणला गेला. एखाद्या खासगी संस्थेकडे पैसे पाठवण्याचे काम का केले गेले ? यामागचे कारण काय ?

६. राजीव गांधी फाउंडेशनमध्ये कॉर्पोरेटकडून मोठा निधी घेण्यात आला. त्याचप्रमाणे त्या निधीच्या बदल्यात कंत्राटे देण्यात आली. असे का ?

७. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचे ऑडिटर कोण होते ? ठाकूर वैद्यनाथन आणि अय्यर कंपनी ऑडिटर होती. तर रामेश्वर ठाकूर संस्थापक. ते राज्यसभेचे खासदार आणि ४ राज्यांचे राज्यपालही होते. अनेक वर्ष तेच ऑडिटर होते. अशा लोकांना अशा प्रकारची कंत्राट देऊन सरकारचा नेमका प्रयत्न काय होता ?

८. जवाहर भवनच्या नावावर राजीव गांधी फाऊंडेशनला कोट्यवधींची जमीन लीजवर कशी दिली गेली ? राजीव गांधी फाऊंडेशनची खाती कॅग ऑडिटला का नकार दिला, असे का ? आरटीआय लागू का झाला नाही ?

९. राजीव गांधी फाऊंडेशनने पैसे तर घेतले पण देण्याचेही काम केले. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला ही देणगी कशी दिली गेली ? हे जाणून घ्यायचे आहे.

१०. मेहुल चोकसीने राजीव गांधी फाउंडेशनकडून पैसे का घेतले ? त्याचा या फाऊंडेशनशी काय संबंध ? मेहुल चोकसीला कर्ज का दिले ? देशाला जाणून घ्यायचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघर जिल्ह्यात ड्रोनद्वारे लस वाहतूक यशस्वी

News Desk

रशियन राष्ट्राध्यक्षांनी मुलीवर चाचणी करत COVID-19 च्या लशीची केली नोंद!

News Desk

स्वार्थी राजकारणासाठी जोमात, सामाजिक प्रश्नावर कोमात ! ‘लोकल’च्या वादात रोहित पवारांची उडी 

News Desk