तामिळनाडू | तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांनी हल्लीच महिला पत्रकाराचा गाल थोपटल्यामुळे त्यांच्यावर सर्व बाजूनी टिका होत होती. हे प्रकरण संपते न संपते तोपर्यंत भाजपच्या आणखी एका वाचाळवीराने महिला पत्रकार आणि प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर संतापजनक वक्तव्य केले आहे.तामिळनाडूमधील भाजप नेते एस व्ही शेखर यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन खालच्या भाषेत महिला पत्रकारांविरोधात पोस्ट टाकली होती.
‘मीडियामध्ये अनेक अशिक्षित लोक आहेत. राज्यपालांवर आरोप करणारी महिला पत्रकारही याला अपवाद नाही. शैक्षणिक संस्थांपेक्षा मीडिया सेक्टरमध्ये महिलांचे लैंगिक शोषण केले जाते. महिला पत्रकार पद मिळविण्यासाठी किंवा आपले एखादे काम करुन घेण्यासाठी मोठ्या लोकांसोबत अनैतिक संबंधही ठेवतात. याला ज्या महिला अपवाद आहेत. त्यांचा मला अभिमान आहे. तामिळनाडू मीडियामध्ये जास्तीत लोक ब्लॅकमेलर्स आहेत.’ अशी वादग्रस्त पोस्ट भाजप नेत्याने फेसबुकवर पोस्ट केली होती.
शेखर यांच्या संतापजनक पोस्टमुळे सध्या भाजपवर देशभरातून टिका होताना पहायला मिळत आहे. ही पोस्ट लिहल्यानंतर शेखर यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ती पोस्ट डिलीट करुन त्यांनी लिहलेल्या पोस्ट बद्दल माफी मागितली आहे.
- काँग्रेस प्रवक्ते अरुण सावंत यांची प्रतिक्रीया
भाजपचे महत्वाचे नेते जर अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर आम्ही या प्रकरणाचा तीव्र निषेध करतो. कॉंग्रेसच्या काळात असे कधीही घडले नाही परंतु भाजप सरकारमध्ये अशा घटना वारंवार घडत आहेत याचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या वाचाळवीर नेत्यांवर कोणत्याही प्रकारचे बंधन राहीलेले नाही. पंतप्रधान ही सर्व व्यवस्था नीट ठेवण्यात अपयशी ठरले आहेत.
BJP leader S Ve Shekher issues a statement over his derogatory social media post on women, says 'I had posted it without reading the message. It was removed immediately after my friend pointed it out. If I had hurt anyone, it was not on purpose & I extend my heartfelt apology'. pic.twitter.com/FQ0PT5lXnq
— ANI (@ANI) April 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.