नवी दिल्ली | ओडिशा विधानसभेत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. भाजपाच्या एका आमदाराने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. विधानसभेत घडलेल्या या धक्कादायक घटनेने गोंधळ उडाला. भाजप आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही हे देवगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. अन्न आणि पुरवठा आणि ग्राहक कल्याण मंत्री रणेंद्र प्रताप स्वैन हे विधानसभेत धान्य खरेदीवर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असतानाच हा हा सर्व प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.
भाजपा आमदार सुभाष चंद्र पाणिग्रही यांनी सॅनिटायझर पिण्याचा प्रयत्न केला तेव्हा संसदीय कामकाज मंत्री बिक्रम केशरी अरुखा आणि इतर आमदारांनी त्यांना रोखलं. तसेच त्यांच्या हातातून सॅनिटायझर हिसकावून घेतलं. पाणिग्रही यांनी “सरकार टोकन सिस्टम आणि बाजार समित्यांमधील चुकीच्या व्यवस्थापनासारखे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरलंय. शेतकरी धान्य खरेदीबाबत कायमच चिंताग्रस्त राहिला आहे. मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही” असा गंभीर आरोप केला आहे.
भाजपच्या पाणिग्रही यांनी विधानसभेत सॅनिटायझर पिण्यामागचं नेमकं कारण देखील सांगितलं आहे. ओडिशा राज्य सरकारने आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय ठेवला नाही. शेतकऱ्यांचा प्रश्न विधानसभेत वारंवार उपस्थित करुनही सरकार शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीकडे लक्ष देत नाही. त्यामुळेच आपण सॅनिटायझर पिण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचा दावा आमदार पाणिग्रही यांनी केला आहे.
Odisha: BJP MLA Subash Panigrahi attempted suicide in State Assembly by consuming sanitiser yesterday
"Paddy procurement not being done in Debgad.More than 2 lakh quintal paddy lying unsold. Attempted suicide by consuming sanitiser to draw govt's attention to the issue," he said pic.twitter.com/gYWSlGgMci
— ANI (@ANI) March 13, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.