HW News Marathi
देश / विदेश

भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त

नवी दिल्ली | भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पंतप्रधान मोदी देखील त्रस्त आहेत. अनेकदा भाजपचे हे वाचाळवीर माध्यमांसमोर नको ते वक्तव्य करुन पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याचे लक्षात येताच पंतप्रधान मोदींनी अशा महाशयांना नमो अॅप च्या माध्यमातून संवाद साधत खडे बोल सुनावले आहेत.

यावेळी बोलताना मोदी म्हणालेत अनेकदा पक्षातल्या नेत्यांना पुरती माहीती नसते तरीही ते नको ते बरळतात त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांना प्रकरण लावून धरायला संधी मिळते यात माध्यमांची चूक नसून संपूर्ण चूक पक्षातल्या नेत्यांची आहे. कॅमेरा दिसला की कसली कल्पना नसतानाही अनेक लोक बोलतात त्यांना अधिकृत अनधिकृत वक्तव्याचे देखील भान रहात नाही. त्यामुळे पक्षाची प्रतिमा बिघडते असेही ते म्हणाले.

पक्ष उत्तम काम करत असून सर्व स्तरातील जनतेपर्यंत पोहचला आहे नेत्यांनी त्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी मोदींनी भाजपच्या सर्व नेत्यांना केले आहे.

 

Related posts

खुशखबर… देशात पेट्रोल-डिझेल २.५० रुपयांनी तर महाराष्ट्रात ५ रुपयांनी स्वस्त

swarit

आज मुख्यमंत्र्यांचा भंडारा दौरा, ‘त्या’ रुग्णालयाच्या पाहणीसह पालकांनाही देणार धीर

News Desk

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

News Desk