HW News Marathi
देश / विदेश

भाजपाची पहिली यादी जाहीर; योगींचा मतदारसंघही ठरला

नवी दिल्ली |  उत्तर प्रदेशातील निवडणुकांची घोषणा झाली असून त्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी देखील आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पक्षाने आज (१५ जानेवारी) उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे यंदा अयोध्या किंवा मथुरा येथून निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा सर्वत्र सुरू होती. अखेर ही चर्चा आज थांबली असून भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या यादीत मुख्यमंत्री योगींचा मतदारसंघही निश्चत झाला आहे.

उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपली पहिली यादी जाहीर केली असून या यादीत उमेदवारांना तिकिटं देण्यात आली आहेत. तर यामधील सर्वात मोठे नाव म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे. योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. योगी गोरखपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. तर, मथुरा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान ऊर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांना तिकीट दिले आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य प्रयागराजच्या सिरथू मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत.

आज दिल्लीत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार यादीची घोषणा केली. यादी जाहीर करताना धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, १०७ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून ६३ विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट देण्यात आले आहे. तर २१ नवीन उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये तरुण, महिला आणि समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना प्रधान यांनी उत्तर प्रदेशात भाजप ३०० पेक्षा जास्त जागा जिंकणार, असा विश्वासही व्यक्त केला आहे.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात 59 टक्के मतदान

Aprna

महागाईचा फटका! घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ

Aprna

ऑगस्ता वेस्टलँड घोटाळा : ख्रिस्तियन मिशेल भारताच्या ताब्यात

News Desk