HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानच्या लाहोरमध्ये दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर स्फोट, १८ हून अधिक जण जखमी

लाहोर | पाकिस्तानमधील लाहोरमध्ये दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर झाला असून या स्फोटात तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये पाकिस्तान बॉम्बस्फोटांनी हादरले. या स्फोटात १८ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

 

दाता दरबार दर्ग्यात महिलांसाठी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाला. दक्षिण आशियातील हा सर्वात मोठा सूफी दर्गा आहे. याआधी २०१० मध्ये या दर्ग्याला लक्ष्य करण्यात आले होते. त्यावेळी बॉम्बस्फोटात ४० लोकांचा मृत्यू झाला होता. या दर्ग्याजवळ मोठा बंदोबस्त असतो. सुरक्षा दलाच्या वाहनांना लक्ष्य करण्यासाठीच आत्मघाती हल्ला घडवण्यात आल्याची शक्यता पोलीस अधिकारी काशिफ यांनी व्यक्त केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“लोकांच्या मनातील पोलिसांची नकारात्मक प्रतिमा बदलणं हे मोठं आव्हान”- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Jui Jadhav

बाबा राम रहिमच्या ‘त्या’ इशाऱ्यामुळेच हरियाणात हिंसाचार

News Desk

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन दक्षिण कोरियात दाखल

News Desk