भाजपच्या एका कार्यक्रमा दरम्यान आज संत कबीरनगर या मतदारसंघात भाजप खासदार शरद त्रिपाठी आणि आमदार राकेश सिंह यांच्यात शिलालेखात आपले नाव नसल्यावरून जोरदार हाणामारी झाली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
#WATCH Sant Kabir Nagar: BJP MP Sharad Tripathi and BJP MLA Rakesh Singh exchange blows after an argument broke out over placement of names on a foundation stone of a project pic.twitter.com/gP5RM8DgId
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) March 6, 2019
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम काही दिवसांतच जाहीर होण्याची शक्यता असल्यामुळे सध्या उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी असलेल्या भाजपाकडून विविध कार्यक्रम होत आहे. ठिकठिकाणी उदघाटन आणि भूमिपुजनांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहेत. असाच एक कार्यक्रम खासदार शरद त्रिपाठी आणि मेहदावत विधानसभा मतदारसंघाचे आमदार राकेश सिंह यांच्यासह इतर भाजपच्या नेत्यांच्या उपस्थित झाला.
भूमिपूजनाच्या शिलालेखावर आपले नाव नसल्याने संतप्त झालेले खासदार शरद त्रिपाठी आणि राकेश सिंह यांच्यात बाचाबाची झाली. त्यावेळी शरद त्रिपाठी यांनी चप्पल काढून राकेश सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार राकेश सिंह यांनीही त्रिपाठी यांना प्रत्युत्तर देत मारहाण केली. अखेर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले व दोन्ही नेत्यांना एकमेकांपासून दूर नेले.
मारहाणीच्या या प्रकारानंतर आमदार राकेश सिंह यांचे समर्थक संतप्त झाले आहेत. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घातला. तसेच राकेश सिंह यांच्या अपमानाचा बदला घेतला जाईल, असे आव्हानही दिले आहे
खासदार शरद त्रिपाठी हे इंजिनिअरशी बोलताना दिसत असलेला कार्यक्रमाचा हा व्हिडिओसध्या मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे. दोघांचे बोलणे सुरू असताना आमदार राकेश सिंह हे तिथे आल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून खासदार शरद त्रिपाठी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बंद करून ठेवले आहे. तसेच तिथे मोठ्या प्रमाणावर फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल भाजपाच्या नेतृत्वाने घेतली आहे. तसेच संबंधित खासदार आणि आमदारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश भाजपाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांनी दिली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.