नवी दिल्ली | अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात भारतीय हवाई दलाचे दुर्घटनाग्रस्त विमान एएन-३२ मधील सर्व १३ जवान शहीद झाले असून या सर्व जवानांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे एएन-३२ या विमानातील ब्लॅक बॉक्स देखील ताब्यात घेण्यात आला आहे. १५ सदस्यांचा समावेश असलेल्या बचाव पथकाने एएन-३२ विमानाचे अवेशष सापडल्यानंतर यात प्रवास करणारे जवान शहीद झाल्याची स्पष्ट केल्याची माहिती भारतीय हवाई दलाने ट्वीटरद्वारे दिली आहे.
All 13 bodies and black box of the #AN-32 transport aircraft recovered. Choppers would be used to ferry the bodies from the crash site in Arunachal Pradesh. pic.twitter.com/CN4d5ekl5t
— ANI (@ANI) June 13, 2019
“एएन-३२ विमान दुर्घटनेत विंग कमांडर जीएम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच. विनोद, फ्लाईट लेफ्टनंट ए.तन्वर, फ्लाईट लेफ्टनंट एस.मोहंती, फ्लाईट लेफ्टनंट एमके गर्ग, वाॅरंट ऑफिसर के.के. मिश्रा, सार्जंट अनुप कुमार, कॉर्पोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस.के.सिंह, लीड एअरक्राफ्ट माईन पंकज, नॉन कोम्बटेन्ट कर्मचारी पुतळी आणि नॉन कोम्बटेन्ट कर्मचारी राजेश कुमार शहीद झाले आहेत”, अशी माहिती भारतीय वायू दलाने ट्विट करून दिली आहे.
बचाव पथकाला एअरलिफ्ट करून या दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषांपर्यंत नेण्यात आले. त्यानंतर त्यांना हेलिड्रॉप केले. अरुणाचल प्रदेशमधील सियांग जिल्ह्यात बुधवारी (१२ जून) भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमान एएन-३२ अवशेष दिसले होते. हे दुर्घटनाग्रस्त विमान फारच घनदाट जंगलामध्ये असल्याने त्याठिकाणी पोहोचणे देखील आव्हानात्मक होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.