HW News Marathi
देश / विदेश

बॉलिवूडची गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह, लंडनहून आल्याची लपवली होती माहिती

लखनऊ | कोरोनाग्रस्तांची संख्या भारतात २१९ तर महाराष्ट्रात ५२ वर पोहोचली आहे. दरम्यान, विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्र्किनींग चाचणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु, या चाचणीतूनही काही जण निसटण्याची किंवा आपली ट्रॅव्हल हिस्ट्री लपवण्याच्या घटना या घडतच आहेत. अशीच एक घटना घडली आहे बॉलिवूडची गायिका कनिका कपूर हिने ती लंडनहून आल्याची बातमी लपवल्याची बाब उघडकीस आली आहे. आज (२० मार्च) लखनऊमध्ये ज्या चार जणांचा कोरोना पॉझिटिव्ह असा अहवाल आला आहे, त्यापैकी एक कनिका कपूरही आहे. कनिका कपूरने स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.

कनिका १५ मार्चला लंडनहून लखनऊ विमानतळावर आली होती. विमानतळावर तिचे थर्मल स्क्रिनींग झाले होते. मात्र, तेव्हा मला कोरोना झाल्याची लक्षणे नव्हती असेही तिने सोशल मीडियाद्वारे सांगितले. मात्र, कनिकावर विमानतळावरुन पळून गेल्याचा आरोप केला आहे. एका वाहिनीच्या वृत्तानुसार कनिका कपूर ही विमानतळावरील ग्राऊंड स्टाफच्या मदतीने बाथरुममध्ये लपून राहिली होती आणि त्यानंतर तिने तेथून पळ काढला.

कनिकाने १५ मार्चला लखनऊमधील शालिमार गॅलंट अपार्टमेंटमध्ये एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक अधिकारी आणि नेत्यांनी हजेरी लावली होती. या पार्टीमध्ये एकूण १२५ जण सहभागी झाले होते आणि त्यामूळे पार्टीतील सगळेच जण जेव्हा कनिका कोरोना पॉझिटिव्ह आहे हे समजल्यावर दहशतीखाली आली आहे. या पार्टीशिवाय कनिकाने लखनऊच्या ताज हॉटेलमध्येही मुक्काम केल्याचे समोर आले आहे. ही माहिती कळताच त्या बिल्डींगमधील अनेकजणांनी आपलया तिथला मुक्काम हलवला आहे. तसेच, तिच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोंटाईन करण्यात आले आहे. तसचे, लखनऊच्या आरोग्य विभागाने जे लोक कनिकाच्या सानिध्यात होते त्या सगळ्यांना फोन करुन स्वत:ला कोरोंटाईन करायला सांगितले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पठाणकोट-जालंधर राष्ट्रीय महामार्गावर नाकेबंदीदरम्यान ४ संशयित ताब्यात

News Desk

सीबीआय तपासातून काहीही साध्य होणार नाही, हाथरस प्रकरणावर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

News Desk

पेट्रोल ७ तर डिझेल ५ पैशांनी स्वस्त  

News Desk