बंगळुरू – घरात पाळलेल्या कुत्र्याचा लळा बंगळुरूमधील दोन मुलींसाठी जीवघेणा ठरला आहे. या कुत्र्याचा मृत्यू झाल्याने नैराश्य येऊन मालकीणीने आणि तिच्या खास मैत्रिणीने आत्महत्या केली आहे. बुधवारी पश्चिम बंगळुरूमध्ये ही घटना घडली.
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या सी गॅमिनी या १९ वर्षीय तरुणीकडे पोमेरेनियन जातीचा जिमी नावाचा कुत्रा होता. आजारपणानेत्या कुत्र्याचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने गॅमिनी हिने अश्वथ नगरमधील घरात गळफास लावून आत्महत्या केली.त्यानंतर जिमी आणि गॅमिनी यांच्या मृत्यूचा धक्का काही तासांनंतर तिची खास मैत्रिणीने बिन्नी मील्सजवळ रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली.
आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असणारी गॅमिनी बंगळुरूमधील आरपीए महाविद्यालयात बी. कॉमचं शिक्षण घेत होती. तिची आई विजयालक्ष्मी शिक्षिका असून वडील चिक्कास्वामी ड्रायव्हर आहेत. ‘जिमी हा कुत्रा आमच्याकडे चार वर्षांपासून होता. आजारपणामुळे जुलै महिन्यात त्याचा मृत्यू झाला. जिमीच्या मृत्यूनंतर गॅमिनीमध्ये खूप बदल झाले होते. तिला खुश करण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्न करून पाहिले. तिच्यासाठी गेल्या आठवड्यात आम्ही नवा कुत्रा आणला होता. त्याचंही नाव जिमी ठेवलं. पण तरीही गॅमिनी डिप्रेशनमधून बाहेर आली नाही आणि तिने आत्महत्येचं पाऊल उचललं, असं गॅमिनीची आई विजयालक्ष्मी यांनी पोलिसांना सांगितलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.