कर्नाटक | कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानी स्वतः ट्विट करत याची माहिती दिली होती. त्यांच्या पाठोपाठ आता त्यांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. त्या दोघांनाही बंगळुरुच्या मणिपाल रुग्णालयात दाखल केले आहे.
“माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून माझी प्रकृती ठीक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सेल्फ क्वारंटाईन व्हावे”, असे येडियुरप्पा यांनी ट्विटमध्ये लिहिले होते.
I have tested positive for coronavirus. Whilst I am fine, I am being hospitalised as a precaution on the recommendation of doctors. I request those who have come in contact with me recently to be observant and exercise self quarantine.
— B.S.Yediyurappa (@BSYBJP) August 2, 2020
येडियुरप्पा आणि त्यांच्या मुलीला मणिपाल रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचे रुग्णालयांनी डॉक्टरांनी सांगितले. मणिपाल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. येडियुरप्पा ७८ वर्षांचे आहेत. याआधी कालच (२ ऑगस्ट) देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देखील कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
Karnataka CM BS Yediyurappa has been admitted to the hospital for observation. He is doing well, is clinically stable and will be monitored closely by our team: Manipal Hospital
Karnataka Chief Minister tested positive for COVID19 yesterday. (file pic) pic.twitter.com/s1OGKyjvGf
— ANI (@ANI) August 3, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.