HW Marathi
Covid-19 देश / विदेश राजकारण

शेतकरी, मंजूर, सूक्ष्म, लघुसह मध्यम उद्योगांसंदर्भात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ निर्णय

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या सत्रातील काल (३१ मे) वर्षपूर्ती झाली आहे. मोदींच्या अध्यक्षतेखाली आज (१ जून) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. सध्याची परिस्थिती पाहात पीक कर्ज फेडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे, असा महत्वापूर्ण निर्णय द्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितला.  या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितले. शेतकरी, मध्यम-लघू आणि मंजुरांसाठी मोठे निर्णय घेतले आहे. या पत्रकार परिषेद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी संबोधित केली.

आत्मनिर्भर भारत योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज घोषित करण्यात आले होते. ८० कोटी लोकांना अन्न सुरक्षा देण्यात आली. २० कोटी महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत पोहचवण्यात आली. पीएम किसान योजनेंतर्गत कोट्यावधी शेतकऱ्यांना हप्त्याच्या स्वरुपात मदत देण्यात आली, असे जावडेकरांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या देशात ६ कोटी मध्यम-लघु उद्योग आहेत, असून त्यांना ३ लाखाचे कर्ज २ टक्के व्याज दराने मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तर, मध्यम-लघु उद्योगांसाठी केंद्र सरकारची निर्यातीबाबत विशेष योजना आहे. यात २ लाख मध्यम-लघु उद्योगांचे काम सुरु करणार आहे, अशीही माहिती  नितीन गडकरींनी दिली.

दरम्यान, सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला खर्चाच्या दीडपड हमीभाव देण्याचे आपले वचन पूर्ण केले आहे, अशी माहिती  केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली. २०२०-२१ मधील खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या १४ पिकांसाठी सरकारने हमीभाव जाहीर केला आहे. महत्वाचे म्हणजे पीक कर्ज फेडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे, असे  त्यांनी सांगितले.

 

केंद्रीय मंत्रिमंडळातील महत्त्वाचे मुद्दे

 

 • गुंतवणूक करण्याची मर्यादा २५ लाखांवरून १ कोटीवर
 • मध्यम-लघु उद्योगामुळे ११ कोटीपेक्षा अधिक नोकऱ्या
 • देशात ६ कोटी मध्यम-लघु उद्योग आहेत
 • आतापर्यंत९५ मेट्रिक टन धान खरेदी केली
 • पीक कर्ज फेडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे
 • पीएम योजनेतून शेतकऱ्यांना मोठी मदत
 • किमान आधारभूत किंमतीच्या दीडपट शेतमालाला दर मिळणार
 • शेती संदर्भातील निर्णय
 • फुटपाथवरील दुकानदारांना १० हजाराचे कर्ज मिळणार
 • आत्मनिर्भर भारत अंतर्गत मध्यम-लघू उद्योग चालना
 • मध्यम-लघू उद्योगासाठी ५० हजार कोटींची गुंतवणूक, मध्यम-लघू उद्योगांची भाष बदलली
 • शेतकरी, मंजुरांसाठी मोठे निर्णय घेतेल आहे
 • केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली

Related posts

भारतीय लष्करातील महिला कर्नलला ब्लॅकमेल प्रकरणी आयएसआय एजंटला अटक

News Desk

स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राकडून ‘गरीब कल्याण रोजगार योजना’, २५ हजार मजुरांना मिळणार लाभ

News Desk

Independence Day | स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलचे खास डुडल

News Desk