नवी दिल्ली चीन आणि पाकिस्तानचे संकट एकाच वेळी सीमेवर घोंघावत असताना, संरक्षण मंत्रालयानेलष्करासाठी ४४ हजार ‘लाइट मशिन गन’ खरेदीची निविदा रद्द केली आहे. सुमारे १३ हजार कोटी रुपयांची ही निविदा होती. उंच आणि डोंगराळ भागात उपयोगी पडणाऱ्या नवीन मशीन गन आता मिळणार नसल्यामुळे विशेषत: सैन्याला जुन्याच साधनांच्या साहाय्याने चीनसारख्या बलाढ्य शत्रूला तोंड द्यावे लागणार आहे.
भूदलासाठी ७.६२ एमएम कॅलिबर लाईट मशिन गन खरेदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. त्याठीच्या निविदा प्रक्रियेत ‘इस्रायल वेपन्स इंडस्ट्री’ ही एकमेव कंपनी सहभागी झाली होती.यात परदेशातील कंपनी भारताला ४,४०० मशिन गन विकणार होती, तर उर्वरित मशिन गनची निर्मिती भारतातच होणार होती. त्यासाठी तंत्रज्ञान भारताला देण्यात येणार होते. पण संरक्षण मंत्रालयाने ही निविदाच रद्द केल्याचे वृत्त एका आघाडीच्या वृत्तपत्राने म्हटले आहे. एकाच कंपनीने प्रतिसाद दिल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. यापूर्वीही दोनदा शस्त्रास्त्रे खरेदीची निविदा रद्द करण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.