नवी दिल्ली | राजधानी नवी दिल्लीतील केंद्रीय तपास संस्था सीबीआयच्या मुख्यालयाला ज (८ जुलै) सकाळी आग लागली. अचानक आग लागल्याने सीबीआयचे सारे अधिकारी इमारती बाहेर आले आहेत. इमारतीमध्ये धुराचे लोट असून अग्निशामन दल पोहोचले आहे. फायर ब्रिगेडच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. सीबीआयचे हे कार्यालय दिल्लीच्या लोधी रोडवर आहे. आग कशी लागली, कोणत्या फ्लोअरवर लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
सीबीआयच्या या मुख्यालयामध्ये महत्वाचे अनेक कागदपत्र असतात. यामुळे या आगीतून काय नुकसान झाले, त्याच्या मागचे कारण काय आदी गोष्टी देखील समोर येणे गरजेचे आहे. याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार इमारतीच्या पार्किंगसाईटमध्ये ही आग लागल्याचे समजते आहे. यामुळे इमारतीमध्ये देखील धूर पसरला आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी धूर पाहून इमारतीबाहेर बचावासाठी धाव घेतली होती.
New Delhi | Smoke emanating was due to short circuit in the generator in the CBI building. No fire & damage to properties were reported. After smoke, an automatic sprinkler system was activated. The functioning of the office will be restored in some time: CBI officer pic.twitter.com/5mRnU6c5B3
— ANI (@ANI) July 8, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.