HW Marathi
देश / विदेश

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह यांच्या घरावर सीबीआयचा छापा

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाच्या प्रख्यात वकील इंदिरा जयसिंह आणि त्यांचे पती आनंद ग्रोव्हर यांच्या घरावर तसेच कार्यालयातही सीबीआयने गुरुवारी (११ जुलै) छापा घातला आहे. या दाम्पत्यावर त्यांच्या ‘लॉयर्स कलेक्टिव्ह’ या सामाजिक संस्थेसाठी नियमबाह्य पद्धतीने परदेशी निधी गोळा करून निधी विनियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा जयसिंह यांच्याकडून न्यायालयाने उत्तर देखील मागविले आहे.

इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोव्हर यांच्या मुंबई, दिल्ली येथील कार्यालयांवरही छापे घालण्यात आले आहेत. इंदिरा जयसिंह या २००९ ते २०१४ या काळात अॅडिशनल सॉलिसिटर जनरल या पदावर कार्यरत होत्या. त्यांच्यावर या पदावर कार्यरत असताना परदेशातून निधी जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. लॉयर्स व्हॉईस नावाच्या संघटनेने इंदिरा जयसिंह यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारने ३१ मे २०१६ ते २७ नोव्हेंबर २०१६ ला जारी केलेल्या आदेशांचा हवाला देत वरिष्ठ वकील पौरुषेंद्र कौरव यांनी इंदिरा जयसिंह आणि आनंद ग्रोव्हर यांच्यावर परदेशी निधी विनिमय कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

Related posts

फ्लोरिडात हॉट योगा स्टुडियोमध्ये गोळीबार

Shweta Khamkar

Bharat Bandh : विविध संघटनांचा आज देशव्यापी बंद, ओडिसात हिंसक वळण

News Desk

#Amritsar : लोकांचा उद्रेक, पोलिसांवर केली दगडफेक

Gauri Tilekar