HW News Marathi
देश / विदेश

CDS जनरल बिपीन रावत अनंतात विलीन

नवी दिल्ली | देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अर्थात सीडीएस बिपीन रावत यांचे भारतीय वायूदलाच्या M-17V5 हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. रावत यांची पत्नी मधुलिका यांच्यावर देखील अंत्यसंस्कार झाले आहे. रावत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख अंत्यसंस्कारला उपस्थित होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून रावत यांना मानवंदना देण्यात आली.

बिपीन रावत यांना १७ तोफाची सलामी देण्यात आली असून रावत यांना गार्ड ऑफ हॉनर दिला. रावत यांचे पार्थिव दिल्लीच्या कॉन्टॉन्मेंटमधील ब्रार स्वक्यर येथील स्मशानभूमीवर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. रावत यांच्यावर पार्थिवाला स्मशानभूमीपर्यंत नेतात ‘अमर रहे… अमर रहे… जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम…’ ‘भारत माता की जय…’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा…’ अशा घोषणा देण्यात आल्या. रावत यांचे पार्थिव आज (१० डिसेंबर) सकाळी त्यांच्या निवसस्थानी गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेता राहुल गांधी आदी दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तमिळनाडूमधील कन्नरमध्ये ९ डिसेंबरला कोसळले होते. या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांचे निधन झाले आहे. रावत यांचे पार्थिववर काल (९ डिसेंबर) वेलिंग्टन सैनिक रुग्णालयाबाहेर लष्करी अधिकाऱ्याकडून मानवंदना देत आहेत. रावत यांच्यासह १३ जाणांचे पार्थिव काल (९ डिसेंबर) दिल्लीच्या पालमपूम विमानतळावर आण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्वांना श्रद्धांजली वाहिली. मोदीनंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आदरांजली वाहिली होती

 

हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करणाऱ्यांची नावे

  • सीडीएस बिपीन रावत
  • मधुलिका रावत
  • ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर
  • लेफ्ट. कर्नल हरजिंदर सिंग
  • गुरुसेवक सिंग
  • जितेंद्र कुमार
  • विवेक कुमार
  • बी. साई तेजा
  • हवालदार सतपाल

बिपीन रावत यांचा अल्प परिचय

रावत यांचा जन्म १६ मार्च १९५८ साली झाला होता. रावत यांचे वडील देखील एलएस रावत सैन्यात होते. रावत यांचे प्राथमिक शिक्षण शिमलामधील सेंट एवडर्ड स्कूलमधून झाले. यानंतर त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचे शिक्षण घेतले असून पुढील शिक्षण अमेरिकेत घेतले. रावत यांना १९७८ मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झाले त्यांना ‘बेस्ट कॅडेट’ ठरले. तसेच रावत यांना ‘स्वार्ड ऑफ ऑनर’ या पुरस्कारानेही गौरविण्यात आले. रावत हे २०१६ मध्ये लष्करप्रमुख झाले होते. बिपीन रावत हे डिसेंबर २०१९मध्ये लष्करीसेवेतून निवृत्त होणार होणार होते. पण, सेवानिवृत्त होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती केली. बिपीन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी विराजमान होणारे पहिले व्यक्त आहेत

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

swarit

छोटा राजनसह चौघांना सात वर्षांचा कारावास

News Desk

पंतप्रधानांच्या राहुल गांधींना शुभेच्छा

News Desk