HW Marathi
देश / विदेश

जम्मू-कश्मीरमध्ये यासिन मलिकच्या लिबरेशन फ्रंट संघटनेवर बंदी

श्रीनगर | जम्मू-कश्मीरमधील फुटिरतावादी नेता यासिन मलिकच्या लिबरेशन फ्रंट या संघटनेवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे फुटिरतावाद्यांना जोरदार धक्का बसला आहे. दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत सरकारने बंदी घातली आहे.

यासिन मलिकच्या जेकेएलएफ संघटनेवर दहशतवादी कारवायांना समर्थन दिल्याचा आरोपवरून बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ईडीने मागील काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये छापेमारी केली होती. या छापेमारीमध्ये यासिन मलिकच्या अनेक ठिकाणांवर धाड टाकण्यात आली होती. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने फुटिरतावाद्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.

यासिन मलिकची जम्मू कश्मीर लिबरेशन फ्रंट ही संघटना १९८८ पासून कश्मीर खोऱ्यात फुटिरतावादी विचार आणि हिंसाचार पसरवत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या संघटनेवर बंदी घातली आहे. सरकारचा हा निर्णय म्हणजे दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसीचाच एक भाग असल्याचे केंद्रीय गृह सचिव राजीव गौबा यांनी म्हटले आहे.

 

Related posts

सलमान खानचे ‘चित्रपट’ आणि ‘टीव्ही शो’ भविष्य अंधारात

News Desk

अमेरिकेत पावसाचा कहर, भारतीय विद्यार्थी अडकले

News Desk

‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, काँग्रेसची नवीन टॅगलाइन