HW Marathi
देश / विदेश राजकारण

कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी केंद्राची ४ डिसेंबरला बैठक होणार

नवी दिल्ली | कोरोनामुळे काही राज्यांमध्ये पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारे याबाबत खबरदारी घेत आहेत. हे पाहता, केंद्र सरकार पुढील महिन्यात सर्व राजकीय पक्षांशी बैठक घेणार आहे. राज्यसभा आणि लोकसभेच्या सर्व सदस्यांसोबत ४ डिसेंबरला बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या काळात कोरोनाच्या परिस्थितीविषयी चर्चा केली जाणार आहे.

केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘मी अलिकडच्या काळात रुग्णालये / नर्सिंग होममध्ये आग लागल्याच्या घटनांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. अधिकाऱ्यांनी अग्निसुरक्षा उपायांचे पालन न करणे ही चिंतेची बाब आहे.

गृहसचिव पुढे म्हणाले, ‘नुकतीच राजकोट येथील कोविड रुग्णालयात आग लागल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर अहमदाबादमधील रुग्णालयात आठ जणांचा मृत्यू झाला. भारत कोरोना विषाणूविरूद्ध लढाई लढत आहे, तेव्हा अशा घटना टाळण्यासाठी आपण अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.’

 

 

Related posts

न्याय व कायदा काय ते महाराष्ट्राला शिकवू नये, सामनातून बिहार पोलिसांवर निशाणा

News Desk

अर्णब गोस्वामींबद्दल सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ट्वीट, कुणाल कामराविरोधात अवमानना खटला चालवण्याची मागणी

News Desk

माझे सध्या वाईट दिवस, चांगले काम करताना त्रास होतो !

अपर्णा गोतपागर